Cast Validity Certificate | जात वैधता मिळवा आता फक्त 8 दिवसात, करा असा अर्ज

Cast Validity Certificate

Cast validity certificate: नमस्कार मित्रांनो, इयत्ता बारावीचा निकाल अलीकडे जाहीर करण्यात आला असून ८ जूनपूर्वी आता दहावीचा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागलेले आहेत. व त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करणं सुरु झालेल आहे. पण, विद्यार्थ्यांना शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून जागेवरच म्हणजे घरी बसून दाखले मिळताना दिसत आहेत. cast validity certificate

दुसरीकडे आता गरजू विद्यार्थ्यांना जात पडताळणी कार्यालयाकडून एका दिवसात किंवा जास्तीत जास्त आठ दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र विध्यार्थ्यांना देण्याचे नियोजन जात पडताळणी समिती कडून करण्यात आलेलं आहे.

www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज करावा. ज्याच्या कडे शालेय पुरावे नाहीत त्यांनी महसुली पुरावे जोडून देखील अर्ज करता येऊ शकणार आहे.

जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा कालावधी वास्तविक पाहता 3 महिने असतो . समितीकडून अवघ्या 8 ते 10 दिवसांत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून प्रमाणपत्र दिले जात आहे.खरोखर गरजू विद्यार्थ्याचे नुकसान होत असल्यास समितीच्या सदस्यांची उपलब्धता पाहून एका दिवसात देखील प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे.

ज्या महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत, तेथील सर्व कागदपत्रे घेऊन समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी तत्काळ अर्ज करावा,असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे. cast validity certificate

जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे कुठल्याही विध्यार्थ्याला प्रवेश मिळाला नाही किंवा प्रवेश मिळू शकणार नाही, असे प्रकार होणार नाहीत, याची कटाक्षाने दक्षता समितीकडून घेतली जात आहे.

खालील कागदपत्रे असणे गरजेचे cast validity certificate –

  • 1) संबंधित कॉलेजचे पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड पाहिजे.
  • 2) अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांची स्वाक्षरी, शिक्का, शिवाय अर्जदाराचा फोटो असणे गरजेच.
  • 3) अर्जदाराचा शाळा सोडल्याच प्रमाणपत्र , पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा पाहिजे.
  • 4)अर्जदाराचा जातीचा दाखल्याची झेरॉक्स प्रत – अर्जदार वडिलांचा शाळेचा दाखला पाहिजे,पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा व जातीचा दाखला पाहिजे , वडील अशिक्षित असल्यास तसे शपथपत्र लागेल.
  • 5) अर्जदाराची आत्या, चुलत्यान शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे.
  • 6) अर्जदाराचे आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला लागेल.
  • 7) इतर महसुली पुराव्या मध्ये (गाव न. सात, टॅक्स पावती, खरेदीखत, सहा-ड, फेरफार उतारा, गहाणखत, मालमत्तापत्रक)इत्यादी लागेल.
  • 8)वंशावळ नमुना नं. तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र व फॉर्म नं. 17 लागेल.

कोणत्याही विध्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रा अभावी प्रवेशाला मुकावे लागणार नाही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळाव म्हणून वेळेत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. समितीच्या संकेतस्थळावर सुरवातीला ऑनलाइन अर्ज करावा.व त्या अर्जाची स्वॉप्ट कॉपी कार्यालयामध्ये आणून जमा करण्यात यावी .

त्याची पडताळणी होऊन संबंधित विद्यार्थ्यास 8 ते 10 दिवसांत जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा समितीचा प्रयत्न करणार आहे.जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने कुठल्याही विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होणार नाही. असे ज्ञानदेव सुळ, अध्यक्ष, जात पडताळणी समिती, सोलापूर यांनी एका मुलाखती मध्ये सांगितले आहे.

या बाबीकडे लक्ष द्या –

जात वैधता प्रमाणपत्रासाठी SC संवर्गातील विद्यार्थ्याने 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा पुरावा जोडणे आवश्यक असणार आहे.

VJNT तील विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 21 Nov 1961 पूर्वीचे पुरावे जोडने बंधनकारक असेल.

जात वैधता प्रमाणपत्रासाठी OBC व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करताना 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचे पुरावे जोडणे बंधनकारक राहील.

 


Post a Comment

Previous Post Next Post