Land Remains Ownership | जमिनीवर स्वत:चा मालकी हक्कसाठी हे 7 कागदपत्र असतील तर जमिनीवर मालकी हक्क राहतो

Land Record

Land Remains Ownership: जमीन मग ती शेतजमीन असो की बिगरशेतजमीन. जमिनीच्या मुद्द्यावरून वाद-विवाद होत असल्याचं नेहमी समोर येतं. इकतंच काय याच मुद्द्यावरून राज्यभरात लाखो खटले प्रलंबितही आहेत.बऱ्याचदा तर असं होतं की, जमीन कसणारा एक पण प्रत्यक्षात मालक मात्र दुसराच निघतो.त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद निर्माण झाल्यास, संबंधित जमीन ही आपल्याच मालकिची आहे, हे सिद्ध करण्यासाठी जमिनीसंबंधीचे काही पुरावे कायमस्वरुपी जतन करुन ठेवणं गरजेचं असतं.हे 7 पुरावे नेमके कोणते आहेत, याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

 

 

1. खरेदी खत
जमिन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद अवश्य पाहिला जातो. तो म्हणजे खरेदी खत. खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जातो. यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झाला याची सविस्तर माहिती असते. खरेदी खत झालं की ती माहिती फेरफारवर लागते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद होते. खासगी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया काय आहे?
शेतातून विजेची लाईन गेल्यास किंवा टॉवर उभारल्यास किती मोबदला मिळायला हवा? land remains ownership

 

 

2. सातबारा उतारा
शेतजमिनीचा सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा उतारा आहे. गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे

किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे, हे नमूद केलेलं असतं. सातबारा उताऱ्यावर भूधारणा पद्धत नमूद केलेली

असते. यावरून जमिनीचा खरा मालक कोण, याची ओळख पटण्यास मदत होते.

 

भोगवटादार वर्ग- 1 या पद्धतीतमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.
भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही.
तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या ‘सरकार’ या प्रवर्गात मोडतात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात.
चौथ्या प्रकारात ‘सरकारी पट्टेदार’ जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात.

या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्वार दिल्या जातात.

आता सरकारनं डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

आता 1985 सालापासूनचे खरेदी खत तुम्ही ऑनलाईन पाहू शकता.3. खाते उतारा किंवा 8-अ
एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असू शकते. या सगळ्या गट क्रमांकांमधील शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असते.8-अ उताऱ्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोणकोणत्या गटात आहे, त्याची माहिती कळते. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी 8- अचा उतारा महत्त्वाचा दस्ताऐवज मानला जातो. महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं 1 ऑगस्ट 2020 पासून डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ उपलब्ध करून दिला आहे.

 

4.जमीन मोजणीचे नकाशे
जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात काही वाद उद्भवल्यास जमिनीची मोजणी केली जाते.यावेळी जमीन मोजणीचे नकाशे तुमच्याकडे असल्यास तुमचा त्या जमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करता येऊ शकतो. त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे जपून ठेवणं गरजेचं असतं. एका ठरावीक गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते. तसंच तुमच्या शेताला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. म्हणजे शेजारी कोणत्या शेतकऱ्याचं शेत आहे, तेही यातून कळतं. आता तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईनही पाहू शकता.


5. जमीन महसूलाच्या पावत्या
दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्यांमार्फत दिली जाणारी पावती, हासुद्धा जमिनीच्या मालकी हक्काबाबत महत्तावाचा पुराव

ठरू शकतो. या पावत्या एका फाईलमध्ये सांभाळून ठेवल्यास वेळप्रसंगी त्याचा पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो.

 

6. जमिनीसंबंधीचे पूर्वीचे खटले
एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल आणि या जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला चालला असेल तर अशा केसची


कागदपत्रं, त्यातील जबाबाच्या प्रती, निकाल पत्र इत्यादी कागदपत्रं जपून ठेवली पाहिजे. याचाही वापर जमिनीवर मालकी हक्काचा दावा

करण्यासाठी करता येऊ शकतो.

 

7. प्रॉपर्टी कार्ड
बिगरशेती जमिनीवर तुमची मालमत्ता असेल तर त्याच्या मालकी हक्काविषयीही जागरूक राहणं आवश्यक असतं. बिगरशेतजमिनीवर

मालमत्तेच्या हक्काविषयी माहिती सांगणारा सरकारी कागद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. ज्या पद्धतीनं साताबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या

मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावानं किती बिगर शेतजमीन आहे, याची

माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते.

 

 

1. खरेदी खत

2. सातबारा उतारा

3. खाते उतारा किंवा 8-अ

4.जमीन मोजणीचे नकाशे

5. जमीन महसूलाच्या पावत् या

6. जमिनीसंबंधीचे पूर्वीचे खटले

7. प्रॉपर्टी कार्ड

तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या ‘सरकार’ या प्रवर्गात मोडतात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात.
चौथ्या प्रकारात ‘सरकारी पट्टेदार’ जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्वार दिल्या जातात.
आता सरकारनं डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे दरवर्षी अपडेटेड सातबारा उतारा काढणं कधीही सोयीस्कर ठरतं.
सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा?
Post a Comment

Previous Post Next Post