Monsoon Maharashtra | पंजाबराव डख यांचा अंदाज या तारखेला महाराष्ट्रात धो धो पाऊस

Monsoon Maharashtra

Monsoon Maharashtra : सध्या राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत असल्याचं चित्र दिसत आहे. कुठे उन्हाचा तडाखा जाणवत आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. यावर्षी देशात चांगला पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवलाय. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख (PunjabRao Dakh) यांनी महाराष्ट्रात यावर्षी कधी पाऊस येईल? यावर्षीचा पावसाळा कसा असेल? याबाबतची माहिती सांगितली आहे.

 
यावर्षी कसा असेल पाऊस?
मागील वर्षी राज्यात पावसाचे प्रमाण अल्प राहीले. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं यावर्षी नेमका कसा पाऊस राहील? असा सवाल उपस्थित केला जातोय. गेल्या वर्षी आपल्याला माहित आहे की एल निनो सक्रिय झालेला होता. त्यामुळं संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता. परंतू, यावर्षी एल निनोची स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आली आहे. येणाऱ्या तीन ते पाच आठवड्यामध्ये ला नीनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस अपेक्षित आहे.


दुपारपर्यंत तापमानात वाढ, दुपारनंतर वादळाची स्थिती
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाच्या अभिसरणाची स्थिती निर्माण झालीय. दुपारपर्यंत तापमानात वाढ जाणवेल, असंही सांगण्यात आलंय. या स्थितीमुळं वातावरणातील आर्द्रता वाढू शकते. वातावरणातील या बदलांमुळं शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं नैऋत्य मोसमी वाऱ्याचं आगमन दक्षिण निकोबार बेटावर आणि दक्षिण अंदमान सागरात झाल्याच सांगितलं. याशिवाय मान्सून मालदीव, कोमोरिन भाग, आणि बंगालच्या खाडीच्या दक्षिणेकडील भागात झाल्याचं सांगितलं.

Post a Comment

Previous Post Next Post