Panjabrao Dakh Havaman Andaj | ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर वाढणार, राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस ?

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : नुकताच जून महिना संपला असून जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. जुलै हा मान्सूनचा दुसरा महिना. मान्सूनच्या पहिल्या महिन्यात अर्थात जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यावर निश्चितच जोरदार पाऊस झाला आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. तथापि राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बरसला आहे.

त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे.


ज्येष्ठ हवामान अभ्यासकं पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार या संदर्भात पंजाबरावांनी मोठी माहिती दिली आहे.

पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात आता तीन जुलै पर्यंत पावसाचा जोर कमी राहणार आहे. 3 जुलै पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे मात्र पावसाचा जोर हा कमी राहील.


जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. मात्र आता 3 जुलै पर्यंत पावसाचा जोर थोडासा कमी राहिल आणि यानंतर पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात चार जुलैपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.

चार ते दहा जुलै दरम्यान राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाबराव सांगतात की ज्या वर्षी पूर्वेकडून पाऊस येतो त्यावर्षी महाराष्ट्रात सर्व दूर चांगला पाऊस पडतो.

यावर्षीही राज्यात पूर्वेकडून पाऊस दाखल झाला आहे आणि यामुळे अहमदनगर, बीड, सोलापूर, लातूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भसहित संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

एकंदरीत येत्या दोन दिवसांनी महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. ज्या भागातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती त्या शेतकऱ्यांना नक्कीच यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.Post a Comment

Previous Post Next Post