Havaman Andaj | या तारखेपासून पुर्वमोसमी पावसाला सुरवात पंजाबराव डख


मान्सूनपूर्व पाऊस ; या तारखेपासून पुर्वमोसमी पावसाला सुरवात पंजाबराव डख 

मान्सूनपूर्व पाऊस ; पंजाबराव डख यांनी आधिच्या अंदाजात सांगितलेल्या प्रमाणे 30 एप्रिल पासून राज्यातील हवामान कोरडे झाले आहे. डख यांनी दिलेला मागचा अंदाज पुर्णपणे खरा ठरला असून, राज्यात गेल्या 15 दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी गारांसह पाऊस झाला. 30/एप्रिलपासून राज्यातील हवामान कोरडे झाले असून उन्हाचा चटका वाढला आहे.


हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आज नवीन अंदाज दिला असुन या अंदाजामध्ये त्यांनी पुन्हा 07/मे पासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू होईल असे सांगितले आहे. 07/मे ते 11/मे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वारे वाहतील तसेच विजेच्या कडकडाटासह गारपीटीचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.


राज्यात 07/मे ते 11/मे दरम्यान विदर्भ, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काढणी 07/मे पर्यंत पूर्ण करावी.




Post a Comment

Previous Post Next Post