Panjab Dakh Havaman Andaj : आता रिमझिम पाऊस थांबणार आणि मोठ्या पावसाला सुरुवात होणार अस भाकीत वर्तवलंय ते पंजाबराव डख यांनी. खरे तर जुलै महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली. मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या तीन-चार दिवसात पावसाने उसंत घेतली होती.
जुलै महिन्याच्या अखेरीस मोठ्या पावसाने ब्रेक घेतला आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सातत्याने होत असलेल्या रिमझिम पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये शेती पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला.
मात्र आता हे रिमझिम पावसाचे अन ढगाळ हवामानाचे सावट दूर होणार आहे. कारण की आता महाराष्ट्रात मोठा पाऊस पडणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी यावेळी जाहीर केला आहे.
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पाच ऑगस्टपर्यंत चांगला मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी सूर्यदर्शन होणार आणि कडक ऊन पडणार असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे. तसेच जिथ कडक ऊन पडणार तिथे पावसाचाही जोर कायम राहणार असा अंदाज आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ऑगस्टपर्यंत राज्यातील अमरावती, वर्धा, नागपूर, अकोला, वाशिम, अचलपूर, सिंदखेडराजा, जालना, बुलढाणा, वैजापूर, अकोट, सिल्लोड, नाशिक, मालेगाव, जळगाव, इगतपुरी, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर सहित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे पण आता या चालू महिन्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल असा अंदाज यावेळी पंजाब रावांनी व्यक्त केला आहे.
5 तारखे नंतर पावसाचा जोर कमी होणार
डख यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात सहा आणि सात ऑगस्टला पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात कडक ऊन पडणार असा अंदाज आहे. या काळात पावसाची उघडीप राहील पण लगेचच 8 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा पुन्हा एकदा जोर वाढण्याची शक्यता आहे.