Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथा परिसरावर जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अगदी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे भारतीय हवामान खात्याने आज देखील मुंबई सह कोकणात आणि घाटमाथ्यावर चांगल्या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, आज उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पंजाब रावांनी 26 जुलै पर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे राजधानी मुंबई बाबत बोलायचं झालं तर 18 तारखेपर्यंत म्हणजेच 16, 17 आणि 18 हे तीन दिवस राजधानी मुंबईत अगदीचं अतिवृष्टी सारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतरही महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार असे नाही तर पावसाचा जोर हा कायम राहणार आहे.
पंजाबरावांनी 21 जुलैपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आणि 26 जुलै पर्यंत राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असा अंदाज यावेळी दिला आहे.
अर्थातच राज्यात 21 ते 26 जुलै दरम्यान चांगला पाऊस होणार असे पंजाब रावांनी आपल्या या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. पंजाबराव यांच्या मते या कालावधीत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे.
या कालावधीत राज्यातील पूर्व आणि पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, मराठवाडा या भागात चांगला जोरदार पाऊस होणार असून अनेक छोटे-मोठे तळे भरले जातील असा विश्वास पंजाबरावांनी यावेळी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे या जोरदार पावसामुळे मोठ्या धरणांमध्ये देखील पाण्याची आवक वाढणार असे पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे. खरे तर, जून महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला.
जुलै महिन्यातही परिस्थिती फारच बदलली असे नाही, तर जुलै महिन्याची सुरुवात देखील पावसाच्या दृष्टिकोनातून निराशाजनक राहिली. पण गेल्या काही दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला मुसळधार पाऊस झाला आहे.
तसेच पंजाब रावांनी आणि भारतीय हवामान खात्यातील काही निवृत्त शास्त्रज्ञांनी आगामी काही दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.