Maharashtra Rain | काळजी वाढवणारी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ 25 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता

Maharashtra Rain



Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी वादळी पाऊस देखील होत आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा हा 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे.



म्हणजेच राज्यात ऊन, पावसाचा खेळ पाहायला मिळतोय. अशातच आता भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून एक नवीन हवामान अंदाज समोर येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आगामी काही दिवस मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आगामी काही दिवस वादळी पावसाचे सावट कायम राहणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे.


खरे तर गेल्या काही महिन्यांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. जेव्हापासून रब्बी हंगाम सुर झाला आहे तेव्हापासून विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.


जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ढगाळ हवामान, वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसलाय. आता एप्रिल महिन्यातही वादळी पावसाचे सत्र सुरु आहे.


त्यामुळे ऐन काढणीला आलेल्या शेती पिकांचे मोठे नुकसान झालय. विशेष म्हणजे आगामी चार-पाच दिवस वादळी पावसाचे वातावरण कायम राहणार असे बोलले जात आहे.

आज कुठं बरसणार वादळी पाऊस 

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज पश्चिम महाराष्ट्र, खानदेश मराठवाडा विदर्भ विभागात पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस हजेरी लावणार असे म्हटले जात आहे.

आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आज खानदेशमधील धुळे, नंदूरबार, जळगाव मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि विदर्भ विभागातील अकोला, अमरावती, भंडारा, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि यवमाळ या 25 जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस होणार आहे. त्यामुळे या सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.




Post a Comment

Previous Post Next Post