Panjabrao Dakh News | सलग 11 दिवस महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग

Panjabrao Dakh News

 

Panjabrao Dakh News : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज जारी केला आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे आहे. सप्टेंबर च्या सुरुवातीला जोरदार पाऊस बरसल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे.


एक ते तीन सप्टेंबर दरम्यान आणि सात ते दहा सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला होता. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमालीचा कमी झाला आहे.



अशातच, ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज जारी केला आहे. पंजाब रावांनी आपल्या या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात जवळपास 11 दिवस सलग मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.



अशा परिस्थितीत आता आपण पंजाबरावांचा हा नवीन हवामान अंदाज नेमका कसा आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत



पंजाब डख म्हणतात…


डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आता पुढील चार दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. राज्यात पुढील चार-पाच दिवस म्हणजेच 20 सप्टेंबर पर्यंत कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार नाही असे पंजाब रावांचे म्हणणे आहे.


यामुळे शेतीमधील महत्त्वाची कामे या काळात करून घेणे अपेक्षित आहे. ज्या शेतकऱ्यांचा सोयाबीन काढणीसाठी आला असेल त्यांनी लवकरात लवकर सोयाबीनची काढणी करून त्याची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून घ्यावी.


कारण की 21 सप्टेंबर नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचे तांडव सुरू होणार आहे. 21 सप्टेंबर नंतर सलग अकरा दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस


पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात सर्व जोरदार पावसाची शक्यता आहे. पण, या काळात राज्यातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


महत्वाचे म्हणजे या विभागातील लातूर, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोकण, अहमदनगर, पुणे, बीड या भागात पावसाची तीव्रता सर्वाधिक पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.


या जिल्ह्यांमधील काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असून यामुळे पूरस्थिती तयार होऊ शकते अशी भीती सुद्धा पंजाब रावांनी बोलून दाखवली आहे. यामुळे सदरील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी विशेष सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post