Havaman Andaj | पुढील 2 दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज | Panjabrao Dakh

Havaman Andaj

राज्यामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून पावसाने हजेरी लावलेली आहे राज्याच्या विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे तसेच काही भागात गारपीट सुद्धा झालेली असल्याने शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी वेळेवर सावध होणे गरजेचे आहे


राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील दोन दिवस असण्याची शक्यता व्यक्त केलेली असली तरीसुद्धा पुढील दोन दिवसानंतर मात्र पावसाचे वातावरण निवळणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. तसेच गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या विदर्भ व मराठवाड्यातील पावसामुळे किमान तापमानात सुद्धा वाढ झाल्याचे दिसते.


अवकाळी पाऊस आल्याने मोठ्या प्रमाणात शेती पिकांची नुकसान झालेले आहे कारण रब्बी हंगामातील पिके सध्याच्या स्थितीमध्ये काढनीला आलेली आहे, त्यामध्ये विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट झालेली असताना गहू व हरभरा यासारख्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पीके भुईसपाट झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मात्र शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.




Post a Comment

Previous Post Next Post