IMD Live Today | राज्यातील या जिल्ह्यात पुढील ५ दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता

IMD Live Today

IMD Live Today : वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे वातावरणाचे चक्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे आणि हवामानात सतत बदल होत आहेत. या बदलत्या वातावरणामुळे अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत असून, शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. अवकाळी हवामानाचे संकट कधी संपेल, याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. त्याचवेळी हवामान खात्याने हवामानाबाबत मोठा अपडेट दिला आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. आजपासून महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबसह उत्तर भारतातील अनेक भागात पुढील ४ ते ५ दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


रेड अलर्ट चा अर्थ काय

ज्या वेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये अति मुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज दिला जातो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट दिला म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता असते.याच गोष्टीमुळे नागरिकांना शक्यतो घरी राहण्याची सूचना केली जाते.ऑरेंज अलर्ट म्हणजे काय

ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला जातो. ऑरेंज अलर्ट म्हणजे अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.अशा वेळेस पण नागरिकांना शक्यतो काम असेल तरच बाहेर पडण्याचा सल्ला दिला जातो.येल्लो अलर्ट म्हणजे काय

येल्लो अलर्ट म्हणजे आगामी येणाऱ्या काही दिवसांमध्ये हवामानातील बदलांमुळे नैसर्गिक संकट येण्याची शक्यता असते. तुमच्या दररोजच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची सूचना केली जाते.ग्रीन अलर्ट म्हणजे काय

ग्रीन अलर्ट म्हणजे परिस्थिती सामान्य आहे परिस्थिती पावसाची परिस्थिती सामान्य असेल अशावेळी कुठलेही निर्बंध नागरिकांवर घातले जात नाहीतPost a Comment

Previous Post Next Post