Havaman Andaj | शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे, या भागात पावसासह गारपीटीची शक्यता

Havaman Andaj, Panjab Dakh


गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू असून काही भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळते, मराठवाडा फ्रेश विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ बसवलेला आहे का रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात या पावसामुळे नुकसान होत आहे. हवामान विभागाने अजूनही पुढील तीन दिवस राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी तसेच सतर्कता देणारी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

मागील एक दोन दिवसांमध्ये विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसासह गारपीट बघायला मिळाली. तसेच पुढील तीन दिवसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे व त्यानुसार पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून काही भागांमध्ये शक्यतो हलक्यातील माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.


मागील दोन ते तीन दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे विदर्भातील झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील असलेल्या हरभरा मका हरभरा अशा प्रकारच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे तसेच कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचे कळाले.या भागात पावसाची शक्यता


येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मराठवाड्यातील जालना, हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून जरा चालक वातावरणामध्ये बदल झाला तर मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे, तसेच विदर्भातील यवतमाळ, भंडारा वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वाशिम अमरावती अकोला तसेच बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.Post a Comment

Previous Post Next Post