Havaman Andaj | विदर्भातील 5 तर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

Havaman Andaj विदर्भातील 5 तर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

मागील काही दिवसांपासून हवामान विभागाअंतर्गत राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे तसेच गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये विदर्भ तसेच मराठवाड्यांमध्ये पावसाचे वातावरण असणार अशा प्रकारची शक्यता हवामान विभागाअंतर्गत देण्यात आलेली होती. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भातील पाच तर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे.



शुक्रवारी म्हणजेच 16 तारखेला विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये तुरळक पावसाने हजेरी लावलेली होती काही भागांमध्ये हलका स्वरूपाचा पाऊस झाला तसेच ढगाळ वातावरण पाहायला मिळाले, तसेच सध्याच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर, मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे कारण रब्बी पिके शेतामध्ये असल्याने अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात या पिकांना फटका बसू शकतो.


विदर्भातील या पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता


विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाअंतर्गत पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये अकोला, भंडारा, अमरावती, वर्धा तसेच नागपूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरीची शक्यता आहे.



मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता


मराठवाड्यातील परभणी, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाअंतर्गत वर्तवण्यात आलेली आहे.

विदर्भ व मराठवाड्यामध्ये जरी हलक्या पावसाची शक्यता असली तरीसुद्धा उत्तर भारतामध्ये मात्र पावसाला पोषक हवामान तयार होत आहे त्यामुळे जम्मू काश्मीर, गिलगिट, मुजफ्फराबाद, लढाख, हिमाचल प्रदेश मध्ये 18 ते 20 फेब्रुवारी तर उत्तराखंडमध्ये 18 ते 19 फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्‍यता आहे.





Post a Comment

Previous Post Next Post