Panjabrao Dakh Havaman Andaj | पुढील आठवड्यात इथे होणार अवकाळी पाऊस कोणत्या जिल्ह्यांना बसणार फटका?

Panjabrao Dakh Havaman Andaj


Panjab Dakh Havaman Andaj : काही दिवसांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने झोडपले. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणत नुकसान झाले. आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसासंदर्भातील एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी अवकाळी पावसासंदर्भातील आहे. गेल्या काही महिन्यांपासून सतत अवकाळी पावसाचे सावट दिसत आहे.



गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. या वर्षी देखील गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. पण गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. याचदरम्यान, ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यातील हवामानासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. डख यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस हजेरी लावणार, असं मत व्यक्त केलं आहे.



पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी येत्या काही दिवसात गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संबंधित राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असल्याने आपल्या महाराष्ट्रातही याचा परिणाम जाणवणार असल्याचं डख यांनी सांगितलं आहे. राज्यात २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.


राज्यातील नागपूर, वर्धा, भंडारा, अचलपूर, अकोट, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, पुसद, हिंगोली, वाशिम आणि बुलढाणा या भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे. पण उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार नाही. दुसरीकडे या कालावधीत मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post