Havaman Andaj | 4 मार्च सोमवार पुन्हा एकदा या जिल्ह्यांमध्ये भयंकर गारपीट सह मुसळधार पाऊसहवामान विभागाअंतर्गत पुन्हा एक हवामान अंदाज जारी करण्यात आलेला आहे, राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता हवामान विभागाअंतर्गत जारी करण्यात आलेली असून विदर्भ मराठवाड्यामध्ये अजूनही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे कारण पश्चिमी वाऱ्याचा झोत दक्षिणेकडे सरकल्याने पावसाचे वातावरण कायम आहे.इतर राज्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हरियाणा, चंदीगड, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातील जळगाव, धुळे, जालना, औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा, अकोला, परभणी, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर, तसेच चंद्रपूर या भागांमध्ये येलो अलर्ट हवामान विभागाअंतर्गत देण्यात आलेला आहे.विजांच्या कडकडाटा सह पवसाची शक्यता वरील जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने दोन मार्च रोजी दिलेली आहे. त्यामुळे काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा होऊ शकतो. परंतु यामध्ये वाईट गत मात्र शेतकऱ्यांची होणार आहे शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागेल.मागील काही दिवसांपूर्वी विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात गारपीट झालेली होती तसेच अवकाळी पावसाने थैमान माजलेले होते अशा स्थितीमध्ये रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, त्यामुळे आता देखील पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
Post a Comment

Previous Post Next Post