Havaman Andaj | पंजाबराव साहेब यांच्या नुसार २,३,४,५,६ मार्च ला इथे होणार अवकाळी पाऊस ⛈️ | Panjabrao Dakh LIVE

Havaman Andaj


Havaman Andaj : महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसहित शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसा संदर्भात. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आगामी काही दिवस पावसाची शक्यता कायम राहणार आहे.


जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्राहीमाम माजवला आहे. अवकाळी पावसाने आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

रब्बी हंगामातील हाता-तोंडाशी आलेले पीक हिरावले गेले आहे. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेतीपिक गारपीटीच्या तडाख्यात डोळ्यादेखत वाया गेले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला आहे. अशातच हवामान खात्याने एक नवीन हवामान अंदाज वर्तवला असून यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे.


आयएमडीने म्हटल्याप्रमाणे आजपासून पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे सावट कायम राहण्याची शक्यता आहे.

आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता आहे. दरम्यान, यापैकी काही भागात अवकाळी पाऊस देखील बरसणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने संबंधित जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, राज्यातील छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर या संबंधीत जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुणे, सातारा, जालना, ठाणे रायगड आणि नंदूरबार या जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे या सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांचे विशेष काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. विशेष बाब अशी की, उत्तर महाराष्ट्रातील काही भागात गारपीट देखील होऊ शकते.

यामुळे उत्तर महाराष्ट्रातील अर्थातच अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहणे या ठिकाणी आवश्यक आहे.




Post a Comment

Previous Post Next Post