Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 5 मार्च ते 31 मार्च दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात मोठी माहिती दिली आहे.
आजपासून मार्च महिन्यातील हवामान कसे राहणार, अवकाळी पाऊस हजेरी लावणार की नाही, थंडी केव्हा गायब होणार ? यांसारख्या सर्व प्रश्नांची उत्तर पंजाबरावांनी दिले आहेत. वास्तविक राज्यात मार्च महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली.
फेब्रुवारी मध्ये देखील अवकाळी पाऊस झाला होता. मार्चमध्ये राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
याचा परिणाम म्हणून काढणीसाठी तयार झालेल्या रब्बी हंगामातील पिकांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी बांधव पुन्हा एकदा संकटात आले आहेत.
दरम्यान ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांनी 5 मार्चपासून संपूर्ण महिना कसे हवामान राहणार ? या विषयी माहिती दिली आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, आजपासून दहा मार्चपर्यंत दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी पडणार आहे.
अर्थातच दहा तारखेपर्यंत रात्रीला थंडी पडेल असे त्यांनी म्हटले आहे. मात्र दहा तारखे नंतर रात्रीची थंडी देखील गायब होणार आणि तीव्र ऊन पडणार असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
तसेच राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात हवामान आजपासून मार्च अखेरपर्यंत प्रामुख्याने कोरडे राहणार असे त्यांनी आपले हवामान अंदाजात पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात आता अवकाळी पावसाची हजेरी लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अर्थातच, आता शेतकरी बांधवांना आपल्या शेतीमधील कामासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीसाठी आता हवामान कोरडे राहील आणि यामुळे पिकांचे नुकसान होणार नाही.
पण, मध्यंतरी हवामान खात्याने यंदाचा उन्हाळा हा खूपच तापदायक राहू शकतो असे सांगितले होते. यामुळे गेल्या वर्षी कमी पाऊस झाला असल्याने यंदा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू शकते अशी भीती व्यक्त होत आहे.