परतीचा पाऊस या जिल्ह्यांना झोडपणार


गेल्या काही दिवसांपासून अडखळलेल्या माेसमी पावसाच्या (Storm downpour) परतीच्या वाटचालीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मध्यप्रदेशातून मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचला असून, शनिवारी उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांतून मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, पाऊस (Maarashtra Downpour) राज्यातून काढता पाय घेत असतानाच, तो काही ठिकाणी जोरदार हजेरी लावण्याची शक्यता (Downpour estimate) हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्याच्या 'या' भगात वादळी वाऱ्यासाह पाऊस
राज्यात ६ ऑक्टोबरपासून मोसमी पावसाच्या परतीची प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज होता, पण ५ ऑक्टोबरलाच पावसाने परतीची वाट धरली आहे. या परतीच्या प्रवासात विजांच्या कडकडाटासह मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील काही भागांत वादळी पाऊस झाला. याचवेळी देशातील अनेक राज्यांमधून माेसमी पावसाने माघार घेतली आहे.

त्याच दरम्यान राज्यात उकाड्याने देखील जोर धरला आहे. वाढलेल्या तापमानामुळे अनेक भागांत ऑक्टोबर हीटचा फटका बसत आहे. हवामान विभागाने सांगितले की, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे देशातील अनेक भागांत पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील काही भागांत ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

राज्याच्या 'या' भागांत उकाडा वाढणार!

राज्यात परतीच्या पावसाची प्रक्रिया सुरू असतानाच, उकाड्यानेही आपला जोर दाखवायला सुरुवात केली आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात ऑक्टोबर हीटचा फटका बसत असून, मुंबईतील तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या आद्रतेमुळे उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांसाठी पुढील काही दिवस उकाडा त्रासदायक ठरू शकतो.

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत येत्या चार ते पाच दिवसांत हलक्या पावसाच्या सरी बरसू शकतात. तरीसुद्धा उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर भागांतही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या भागांत 'यलो' अलर्ट

राज्यातील काही भागांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, नाशिक, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने सोमवारी आणि मंगळवारी देखील राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

कसा असेल मॉन्सूनच्या परतीचा प्रवास?

राजस्थानमध्ये सात दिवसांच्या उशिरानंतर परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या मोसमी पावसाने महाराष्ट्रातून मात्र नियोजित वेळेत परतीची सुरुवात केली आहे. शनिवारी (५ ऑक्टोबर) नंदुरबार जिल्ह्यातून पावसाच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात झाली असून, १० ऑक्टोबरपर्यंत राज्यातून पावसाचा माघारी प्रवास पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पोषक हवामान राहिल्यास हा प्रवास नियोजित वेळेत पूर्ण होईल, परंतु काही परिस्थितींमुळे हा प्रवास लांबण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post