Mansoon 2024 | शेतकऱ्यांनो तयारीला लागा तो येतोय…; Mansoon 2024 आगमनाची तारीख ठरली, ‘या’ तारखेला मानसून अंदमानात दाखल होणार

Mansoon 2024


Mansoon 2024 : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सून 2024 संदर्भात. खरे तर मान्सून निर्मितीला आता सुरुवात झाली आहे. हवामान तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी हवेचा दाब 1000 हेप्टापास्कल वर पोहोचतो त्यावेळी मान्सूनच्या निर्मितीला सुरुवात होत असते. यानुसार आता मान्सून निर्मितीला सुरुवात होत असल्याचे चित्र तयार झाले आहे.


खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने मान्सून बाबतचा आपला पहिला अंदाज दिला. यामध्ये मान्सून 2024 समाधानकारक राहणार असे म्हटले गेले होते.

यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभाग, स्कायमेंट अशा अनेक संस्थांनी यंदा भारतासहित आशियाई देशांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात देखील यंदा मान्सून काळात चांगला पाऊस होणार असा अंदाज हवामान तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.


अशातच आता जेष्ठ हवामान अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे यांच्या माध्यमातून मान्सून 2024 संदर्भात एक मोठी समोर येत आहे. साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून म्हणून वेळेआधीच अंदमानात येण्याची शक्यता आहे.

डॉ. साबळे यांनी म्हटल्याप्रमाणे, आज आणि उद्या हिंदी महासागरावर हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतका अधिक राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून वारे दक्षिणेकडील जास्त हवेच्या दाबाकडून उत्तरेकडील कमी हवेच्या दाबाकडे वाहण्यास सुरुवात होईल.

सद्यःस्थितीत कोकणात वारे नैर्ऋत्येकडून वाहण्यास सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या उगमस्थानापासून चक्राकार वारे वाहत आहेत. वाऱ्याचे ताशी वेग सुद्धा वाढत आहे. हवेत बाष्पाचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान हवामानात होत असलेले हे बदल मानसून आगमनाचे संकेत देत असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. आता मॉन्सून आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली असल्याचे डॉक्टर साबळे यांनी यावेळी म्हटले आहे.

दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सूनचे आगमन २ ते ३ दिवस निर्धारित वेळेपूर्वीच होण्याची शक्यता आहे. खरे तर दरवर्षी अंदमानात 20 ते 21 मे दरम्यान मान्सून पोहोचत असतो. यंदा मात्र हा मान्सून वेळेआधीच पोहोचण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे.

डॉ रामचंद्र साबळे यांनी यावर्षी अंदमानात मान्सूनचे आगमन १७ किंवा १८ मे रोजी होण्याची शक्यता आहे. निश्चितच ही महाराष्ट्रासहित देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता राहणार आहे.




Post a Comment

Previous Post Next Post