Monsoon 2024 | तर महाराष्ट्रात ‘या’ तारखेला दाखल होणार मान्सून ! Mansoon बाबत हवामान खात्याचा नवीन अंदाज पहा….

Monsoon 2024

Monsoon 2024 : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसाने थैमान माजवले आहे. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काल अर्थातच 13 मे 2024 ला मुंबईसह, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, डोंबिवली या परिसरात सोमवारी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या वळवाच्या पावसामुळे मुंबईसह मुंबई उपनगरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळाले.


विशेष म्हणजे काल झालेल्या वादळी पावसामुळे मुंबईत जीवित हानी देखील झाली आहे. या वळवाच्या पावसात सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीवित हानी झाली आहे. यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे. या वळवाच्या पावसामुळे मान्सूनवर काही विपरीत परिणाम होणार का ? यामुळे मान्सूनचे आगमन लांबणार का ? असे काही प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर भारतीय हवामान खात्याने मान्सून संदर्भात नुकतीच एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. हवामान खात्याने मान्सूनचे अंदमानातं कधी आगमन होणार याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून 19 मे च्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे. खरे तर दरवर्षी अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनचे 21 मे च्या आसपास आगमन होत असते.

यंदा मात्र दोन दिवस लवकरच या ठिकाणी मान्सून पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे. त्यानंतर मग मानसून केरळमध्ये दाखल होणार आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढे तो तळ कोकणात येईल आणि तळ कोकणानंतर मान्सूनचे मुंबईत आगमन होणार आहे.

मात्र, भारतीय हवामान विभागाने अजूनही मान्सूनच्या केरळ आगमनाची तारीख जाहीर केलेली नाही. केरळमध्ये मान्सूनचे आगमन कधी होणार या संदर्भात हवामान खात्याने कोणतीच अपडेट दिलेली नाही. परंतु हवामानाचा सध्याचा मूड पाहिला असता यंदा केरळमध्ये देखील मान्सून गेल्यावर्षीच्या तुलनेत लवकरच येण्याची शक्यता आहे.

हवामान तज्ञांच्या मते, मान्सूनच्या वाटचालीत कोणतेचं अडथळे आले नाहीत तर केरळमध्ये मान्सून एक जूनच्या सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मान्सूनचे यंदा भारताच्या मुख्य भूमीत अर्थातच केरळमध्ये वेळेवर आगमन होणार असा अंदाज आहे.

तसेच महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर केरळमध्ये एक जूनला मान्सूनचे आगमन झाले तर तेथून पुढे सात दिवसात अर्थातच आठ जूनच्या सुमारास मान्सूनचे आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागात म्हणजे तळ कोकणात आगमन होण्याची शक्यता आहे.

तळ कोकणात मान्सून दाखल झाल्यानंतर पुढे तो मुंबईत सलामी देतो. यानंतर मग मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असतो. गेल्यावर्षी राज्यात मान्सूनचे 16 जूनच्या सुमारास आगमन झाले होते. म्हणजेच नियमित वेळेपेक्षा जवळपास आठ दिवस मान्सून उशिराने दाखल झाला होता.

यंदा मात्र तशी परिस्थिती राहणार नाही यावेळी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 8 जुनच्या सुमारास होण्याची शक्यता आहे. तथापि, मान्सूनचे केरळ आणि महाराष्ट्र आगमनासंदर्भात हवामान खात्याने अजून कोणतीच अधिकृत अपडेट दिलेली नाही.
Post a Comment

Previous Post Next Post