Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वादळी पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
दुसरीकडे या वादळी पावसाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा फायदा होत आहे. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे ऊस पिकाला पाणी कमी पडणार अशी भीती होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून वादळी पाऊस सुरू असल्याने ऊस पिकाच्या वाढीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरत असल्याचे मत जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, वादळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील उष्णतेचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. अशातच, ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 12 ते 18 मे पर्यंत राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थातच मे महिन्यातील दुसऱ्या पंधरवाड्याच्या सुरुवातीला देखील पाऊस कायम राहणार असे स्पष्ट होत आहे.
काय म्हणताय पंजाबराव डख ?
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ते 18 मे दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत विजेचे प्रमाण जास्त राहील. ठिकठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सर्वात जास्त पाऊस पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे. विदर्भात देखील पाऊस पडणार आहे मात्र पावसाचे प्रमाण या विभागात कमी राहिल असा अंदाज आहे.
तथापि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्तीचा पाऊस राहणार आहे. कोकणात सुद्धा मोठा पाऊस पडणार असा अंदाज आहे. विशेष बाब म्हणजे हा पाऊस ऊस पिकासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.
तथापि या पावसामुळे कांदा व इतर फळ पिकांचे नुकसान होऊ शकते. पंजाबरावांनी राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली या भागात सगळ्यात जास्त पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे.
17 तारखेपर्यंत या भागात मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. मात्र 18 मे नंतर पावसाचे प्रमाण कमी होत जाणार आहे. अर्थातच 18 मे पर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विजेचे प्रमाण आणि वादळी वारे वाहणार असा अंदाज असल्याने शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांची तथा पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान पंजाब रावांनी यावर्षी मान्सून काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. यंदा महाराष्ट्रात 9 जुनच्या सुमारास मान्सूनचे आगमन होणार असे त्यांनी आपल्या आधीच्या अंदाजात स्पष्ट केले होते. तसेच जून अखेरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.