Panjabrao Dakh Havaman Andaj | पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज, ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरु राहणार

Panjabrao Dakh Havaman Andaj


Panjabrao Dakh Havaman Andaj : सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सत्र पाहायला मिळत आहे. राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात अवकाळी पाऊस सुरू आहे. तसेच कोकणासह उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचे चटके बसत आहेत. वादळी पाऊस सुरू असतानाही राज्यातील काही भागांमध्ये तापमान 40°c पेक्षा अधिक नमूद केले जात आहे.



हवामान खात्याने 15 एप्रिल पर्यंत पाऊस सुरूच राहणार असे म्हटले आहे. 15 एप्रिल पर्यंत राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचे आय एम डी ने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.

भारतीय हवामान खात्याने तर वादळी पावसाची शक्यता वर्तवलीच आहे याशिवाय जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील राज्यात पावसाचा अंदाज दिला आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 18 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार आहे.


राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. परभणी जिल्ह्यात देखील 18 एप्रिल पर्यंत वातावरण बिघडलेले राहणार असे त्यांनी म्हटले आहे.

या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार वादळी वारे वाहतील असे त्यांनी सांगितले आहे. या काळात वादळी वाऱ्यासह पाऊसही होणार आहे. या कालावधीत बरसणारा पाऊस हा सर्व दूर होणार नाही मात्र काही-काही भागात पाऊस हजेरी लावणार आहे.


त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे. कांदा, हळद व इत्यादी हार्वेस्टिंग झालेला शेतमाल झाकून ठेवावा असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट होऊ शकते यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. एकंदरीत आगामी काही दिवस राज्यात वातावरण बिघडलेले राहणार आहे.

यंदा मान्सून कसा राहणार

दुसरीकडे हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी आणि हवामान तज्ञांनी यंदा मान्सून काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत चांगला पाऊस होणार असे सांगितले आहे.यावर्षी सामान्य मान्सून राहील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

यंदा ला निनासाठी पोषक परिस्थिती असल्याने आणि इंडियन ओशियन डायपोल पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता असल्याने मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडू शकतो असा अंदाज समोर आला आहे. महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये यावर्षी मान्सून काळात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post