Monsoon News | मान्सून आगमनापूर्वी महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाची तुफान बॅटिंग !

Monsoon News

Monsoon News : गेल्या महिन्याचा शेवट हा वादळी पावसाने झाला. मात्र या चालू महिन्याची सुरुवात ही कडाक्याच्या उन्हाने झाली होती. चालू महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान वाढले होते


अक्षरशा 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचले होते. बहुतांशी ठिकाणी 42 अंश सेल्सिअस पेक्षा अधिकच्या तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रातील मालेगावात गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढ दिसत आहे. यामुळे अंगाची अक्षरशा लाही लाही होत आहे.

मात्र, काही भागांमध्ये तापमानातं वाढ होत आहे तर काही ठिकाणी वादळी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. एकंदरीत महाराष्ट्रात मिश्र वातावरणाची अनुभूती येत आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ हवामान आणि वादळी पाऊस पाहायला मिळत आहे.

एवढेच नाही तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात सुद्धा पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र सप्तशृंगी देवी माता मंदिर नांदुरी (वणीगड) येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

याशिवाय नाशिक जिल्ह्यातील इतरही काही भागांमध्ये पावसाची हजेरी लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पुन्हा एकदा नुकसान होत आहे. या पावसात विजेचे प्रमाण देखील अधिक असल्याने शेतकऱ्यांचा जीव अक्षरशा टांगणीला लागला आहे.


अशातच भारतीय हवामान खात्याने आज अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज गारपीट होणार असाही अंदाज आयएमडीच्या माध्यमातून समोर आला आहे.

हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यापासून दक्षिण अंतर्गत कर्नाटक पर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सुद्धा तयार झाला आहे.

शिवाय, वायव्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती पाहायला मिळतं असून, त्यापासून पश्चिम विदर्भापर्यंत हवेचा एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याचे समजतं आहे. हेच कारण आहे की सध्या महाराष्ट्रात वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.


आज देखील राज्यात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज विदर्भ विभागातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये गारपीट होणारा असा अंदाज व्यक्त केला आहे. वादळी पाऊस अन गारपीटीची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे आज मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्याबाबत बोलायचं झालं तर मराठवाडा विभागातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


विदर्भ बाबत बोलायचं झालं तर विदर्भ विभागातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मध्ये महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ विभागातील या जिल्ह्यांनाही Yellow Alert देखील देण्यात आला आहे.Post a Comment

Previous Post Next Post