Maharashtra News : सध्या राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून या पावसासोबत प्रचंड प्रमाणात उन्हाचा पारा वाढल्याचे देखील चित्र आहे. त्यामुळे काही ठिकाणी झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळत आहे तर काही ठिकाणी प्रचंड उष्णतेने नागरिक त्रस्त झालेले आहेत.
आता मे महिन्याचा जवळपास दुसरा आठवडा सुरू झाला असून आता मान्सूनच्या पावसाचे वेध लागायला सुरुवात झाली आहे व अशाच आता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख राज्यातील एकंदरीत देशातील मान्सूनच्या आगमनाविषयी महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवलेला आहे.
पंजाबराव डख यांनी वर्तवला मान्सूनच्या आगमनाचा अंदाज
साधारणपणे पावसाची परिस्थिती पाहिली तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा पावसाळ्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी पाहायला मिळते अशी परिस्थिती असते. यावर्षी नेमके चित्र कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना उन्हाळ्यामध्ये फारसा महाराष्ट्रात पाऊस झालेला नसल्याने पावसाळ्यात समाधानकारक असा पाऊस होणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी व्यक्त केलेला आहे.
मान्सूनच्या आगमनाविषयीचा अंदाज वर्तवताना पंजाबराव डख यांनी सांगितले की, 22 मे 2024 ला मान्सूनचे आगमन अंदमानत होणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच महाराष्ट्रामध्ये 12 ते 13 जूनच्या आसपास मोसमी पावसाला सुरुवात होणार असल्याचा महत्त्वपूर्ण अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे.
त्यामध्ये पेरणी योग्य पाऊस हा 22 जून नंतर सुरू होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. यासोबतच जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील बऱ्याच भागातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
यावर्षी संपूर्ण पावसाळ्यातील पाऊस कसा राहील याची माहिती देताना त्यांनी म्हटले की जुलै महिन्यात जास्तीचा पाऊस, ऑगस्ट महिन्यामध्ये कमी आणि सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामध्ये राज्यात पूर्व मौसमी पावसाला पोषक परिस्थिती तयार होत असल्याने शेतकरी वर्ग याकडे लक्ष देऊन आहेत.राज्यातील बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पूर्व मोसमी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.